नवीन शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्याचं श्रेय लाटण्यावरून कडोली गावात दोन गटात राजकारण पहावयास मिळालं आहे.एका गटाने पुतळा बांधकाम सुरू केलं तर एका गटाने शासकीय मदत मिळवून दिली आहे मात्र गडावरील माती पुतळ्याचा चौथऱ्यात घालण्या वरून गावात दोन गटात वाद झाला होता. रविवारी नियोजित कार्यक्रमावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे तणावाच वातावरण होत.
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहितीनुसार रविवारी विविध 18 गडावरून आणण्यात आलेली माती चौथऱ्यात घालण्यात येणार होती यासाठी एका गटाकडून रविवारी समर्पित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुसऱ्या गटाने चौथऱ्यात माती घालण्याचा कार्यक्रम सर्वजण मिळून करू याबाबत पोलिसात तक्रार केली होती त्यामुळे पोलिसांनी यात हस्तक्षेप करून गावातील लोकांची समिती नेमण्यात आली आहे माती घालण्याचा कार्यक्रम मात्र गावातील राजकारणामुळे ते पुढें ढकलण्यात आला आहे यामुळे शिवप्रेमींतून नाराजी व्यत करण्यात येत आहे.
रविवारी समर्पित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खरे मात्र यावेळी काही राजकीय मंडळींनी याला विरोध दर्शविला आणि शिव प्रतिष्ठापना रोजीचं चौथऱ्यात माती घालण्याचा अन कार्यक्रम करण्याचा सल्ला दिला.रविवारच्या कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते दुरंडेश्वर मठात या कार्यक्रमाचे आयोजन करणात आले होते मात्र विरोध झाल्याने पोलिसांनी यात उडी घेऊन हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले
शिवाजी महाराजांचे पुतळे गावात त्यांचा आदर्श घेण्यासाठी बसवले जातात मात्र कडोलीत पुतळा बसवतानाच राजकारण श्रेयवाद पहावयास मिळाल्याने महाराजांचा पुतळा बसवण्याचा मूळ उद्देश्य हरवला आहे अशी टीका या वाद करणाऱ्या दोन्ही गटातील नेत्यावर होत आहे