ब्लु व्हेल या जीवघेण्या अश्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या खेळात बेळगावातील काही विद्यार्थी अडकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेळगावातील कॅम्प भागातील एका शाळेत जवळपास 25 विध्यार्थीनी या गेम च्या जाळ्यात अडकल्याचा संशय शाळा व्यवस्थापनाला आला त्यामुळं शिक्षकांनी सर्व विद्यार्थिनींना प्राचार्य कडे नेऊन पालकांना बोलावून सक्त ताकीद दिली आहे. मात्र हा नक्कीच ब्लु व्हेल गेम आहे की नाही ही माहिती समजली नाही आहे
आपल्या मुलांना अश्या धोकादायक खेळा पासून दूर ठेवा आणि मुलांवर लक्ष ध्या अशी सूचना देखील शाळेने दिली आहे.कॅम्प भागातोल एका शाळेत हा प्रकार घडला असून ज्यावेळी पालकांना हा प्रकार शिक्षकांनी सांगितलं त्यावेळी पालक अक्षरशः घाबरले होते. इयत्ता आठवी ते दहावी च्या विध्यर्थिनींच्या हातावर एक सारख्या खुणा आढळल्याने शिक्षक चक्रावून गेले होते.
शनिवारी ही घटना उघडकीस आल्याने रविवारी कोणतीही शिक्षण अधिकारी प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध नव्हता. बेळगाव तालुक्यातील मंडोळी हायस्कुल मध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली आहे शाळेचे मुख्याध्यापक के व्ही जठार यांनी विध्यार्थ्यानी अनावश्यक मोबाईल वापर टाळावा पालकांनी यात लक्ष घालावे अस आवाहन केले आहे त्यामुळं शाळेत आम्ही मोबाईल वर बंदी घातली अस देखील ते म्हणाले.
काय आहे ब्लु व्हेल
मंडळी,
वाचा डॉ सोनाली सरनोबत काय म्हणतात
आजकाल मोबाईलवर गेम खेळण्याची सगळ्यांनाच सवय लागली आहे. कँडी क्रश, लुडो असे गेम तर आपण खेळतच आहोत, पण एखाद्या गेमच्या शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला तुमचा जीव द्यावा लागला तर? इंटरनेटवर असाही एक गेम आहे त्याचं नाव आहे ब्लू व्हेल!!
तुम्हाला हा खेळ प्ले स्टोअरवर सापडणार नाही आणि शोधायला पण जाऊ नका, उगाचच जीवावर बेतेल. तर हा खेळ म्हणे सगळ्यात आधी रशियात सुरू झाला. नेटवर बरेचसे फोरम्स असतात. तिथं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालतात. म्हणजेच आत्महत्या या विषयाचे फोरम्सपण आहेच. तर अशा फोरमवर या गेमचे अडमीन तुम्हाला संपर्क साधतात आणि या खेळात तुम्हाला सामील करून घेण्यासाठी तुमच्यासमोर पर्याय ठेवतात. या खेळात तुम्हाला पन्नास वेगवेगळे टास्क दिले जातात. रात्री 4 वाजता उठणे, एकट्याने हॉरर सिनेमा पाहणे अशा लहानसहान कामगिऱ्या पार पाडण्यापासून या गेमची सुरवात होते. पुढे जाऊन हातावर सुईने नाव किंवा व्हेलचे चित्र कोरणे अशी त्याची हिंसकता वाढत जाते. शेवटचे टास्क अर्थातच स्वतःचा जीव घेण्याचे असते. तुम्हाला या सगळ्या टास्कचे फोटो आणि व्हिडीओ पुरावा म्हणून् अडमीनला पाठवायचे असतात. आणि जर असं केलं नाही तर? तर त्या लोकांकडे आपली सगळी माहिती असते आणि जर तुम्ही आत्महत्या केली नाही, तर या गेमचे ॲडमीन तुमची हत्या करतील अशा धमक्या दिल्या जातात. आजकाल आपण सोशल मिडियावर सहजपणे आपली इतकी माहिती शेअर करतो, की आपण कोण, कुठले, आपले मित्र आणि कुटुंबीय कोण, घरचे कार्यक्रम.. इतकंच काय, काय आणि कुठं खाल्लं हे ही लोकांना माहित असतं.
आता या खेळाची सुरवात रशियात झाली असली तरी जगातल्या अनेक देशात याचं लोण पसरलं आहे.
ब्लू व्हेल’ खेळणाऱ्यांना एका ग्रूपचं सदस्य व्हावं लागतं. ही रशियन तरुणी त्या ग्रूपची अॅडमिन होती. जी मुलं या सापळ्यात अडकायची त्यांना ती धमकावत असे. आपल्या सूचना न ऐकल्यास, टास्क पूर्ण न केल्यास आई-वडिलांना, बहीण-भावाला ठार मारण्याची धमकी ती द्यायची, अशी माहिती रशियन तपास पथकाने दिली. त्यांची या तरुणीची ओळख उघड केलेली नाही. जाळ्यात आलेल्या मुलांना ही तरुणी ५० टास्क द्यायची. त्यातून त्यांची शारीरिक आणि मानसिक छळवणूक करायची आणि अखेर त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडायची. ही विकृती नेमकी कुठून आली आणि त्यातून तिला काय आनंद मिळायचा, हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
गेम डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हा गेम साध्या डोळ्यांनी खेळता येत नाही. त्यासाठी ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी डिव्हाईस’ची गरज असते, त्यानंतरच तुम्ही त्या गेममध्ये प्रवेश करु शकता. एकदा का तुम्ही त्या गेममध्ये प्रवेश केला की तुम्हाला रोज एक टास्क देण्यात येतं. यात 50 टास्क असतात. 50 व्या दिवशी तुमच्या आयुष्यासोबत हा गेम संपतो.
ब्लू व्हेल गेममधील जीवघेणी ‘टास्क’ ………
– तुमच्या हातावर किंवा खांद्यावर एक ठराविक गोष्ट कोरुन घ्यायची
– पहाटे 4.20 वाजता उठा आणि तुमच्या गेमच्या प्रमुखानं पाठवलेला भयानक व्हिडीओ बघा
– तुमच्या खांद्यावर ब्लेडमध्ये कट मारुन घ्या…
– कागदावर व्हेल माशाचं चित्र काढा
– तुम्हाला व्हेल बनायचं असेल तर तुमच्या पायावर S असं कोरा, नाही तर तुमच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी कट मारुन घ्या.
– त्यानंतर तुम्हाला सिक्रेट टास्क मिळतो
– आलेला सिक्रेट मेसेज तुमच्या खांद्यावर कोरुन घ्या
– तुम्ही व्हेल असल्याचा ऑनलाईन मेसेज टाका
– पहाटे 4.30 वाजता उठून टेरेसवर जा
– स्वत:च्या हातावर व्हेल कोरुन घ्या
– दिवसभर भयानक व्हिडिओ बघा
– गेम प्रमुखानं पाठवलेलं संगीत ऐका
– स्वतःचे ओठ कापून घ्या
– स्वत:च्या शरीरावर जखमा करुन घ्या
– टेरेसच्या कठड्यावर उभं रहा. आणि पाय बाहेर सोडून कठड्यावर बसा
– पुलावर उभं राहा
– दिवसभर कुणाशीही बोलू नका
– दरम्यान, गेमप्रमुख तुमच्या मरणाची तारीख ठरवतो
– तुम्ही व्हेल आहात, हे कुणालाही सांगू नका अशी गोपनियतेची शपथच घ्यावी लागते
मॉस्को शहरातील एका व्यक्तीला, तरुणींना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
इंगलंड आणि दुबईमधल्या शाळांनी काही दिवसांपूर्वी पालकांना या खेळापासून आपल्या पाल्यांना वाचविण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता हा असा धोकादायक प्रकार आपल्या अगदी दारातच येऊन उभा आहे का हा प्रश्न बेळगांवच्या मुलाच्या आत्महत्येनंतर उभा राहिला आहे.
*पालकांनी काय सावधानता बाळगावी** ?
तुमचा मुलगा मोबाईलवर अशी जीवघेणी गेम खेळताना आढळून आल्यास तात्काळ त्याला ही गेम खेळण्यापासून परावृत्त करा. ‘ब्लू व्हेल चॅलेन्ज’ गेममध्ये दिलेल्या टास्कपैकी एखादीही क्रिया अथवा तशी लक्षणं तुमच्या मुलाच्या वर्तणुकीतून आढळून आल्यास त्याला रोखा, त्याला ही जीवघेणी गेम खेळण्यापासून रोखा, आवशक्यता वाटल्यास त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा.
खरंतर कुठल्याही खेळातच काय किंवा कोणत्याही मनस्थितीमध्ये आत्महत्येचा विचार करणे चुकीचेच आहे. या खेळाकडे सहसा 14-15 वर्ष वयोगटातली मुलं जास्त आकर्षित होताना दिसतात. या वयोगटातल्या पालकांनी आपल्या मुलांशी वेळोवेळी संवाद ठेवणे आणि इंटरनेटसारख्या माध्यमातून ब्लु व्हेलसारख्या खेळापासून दूर कसे राहावे याचे मार्गदर्शन करणेच योग्य.