विमानतळावरून बेळगावच्या आकाशातून येत्या नोव्हेंबर पासून हवाई उड्डाणे वाढणार आहेत. क्लास ३ प्रकारच्या विमानांसाठी ३ पार्किंग आणि प्रत्येक उड्डाणासाठी एकावेळी ३०० प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता यामुळे आता बेळगाव विमानतळ अधिक सक्रिय होईल.
स्पाईस जेट ची मुंबई आणि बंगळूर विमानसेवा आहेच, त्यात ३ ऑक्टोबर पासून चेन्नई आणि मुंबईला जोडणाऱ्या दोन वाढीव विमानांची भर पडणार आहे.
याचबरोबर इंडिगो कम्पनी मुंबई बेळगाव आणि तिरुपती साठी स्वतंत्र विमान उपलब्ध करण्याच्या नियोजनात आहे. घोडावत समूहास डिजिसीए ने दोन स्थानिक विमाने सुरू करण्याची परवानगी दिली असून त्याचे मुख्य तळ बेळगाव विमानतळच असणार आहे. हा समूह दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि तिरुपती साठी स्वतंत्र विमान सुरू करण्याच्या तयारीत आहे. रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याचे साध्य झाल्याने ही उड्डाणे लवकर सुरू होतील.
सुविधा वाढल्या, विमान प्रवासीही वाढले यामुळे हवाई कँपन्यांना स्पर्धा वाढली आहे, यामुळे प्रवाशांना पर्याय व आकर्षक प्रवास दर खुले होतील. जागतिक पातळीवरील एकस कम्पनीने लष्करी साहित्य निर्मितीसाठी डीआरडीओशी करार केला आहे, अर्थात प्रवास वाढला , सर्वो कंट्रोल या कम्पनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार नव्या १२ एकर जागेत केला आहे, तुम्ही कुठल्याही विमानात बसा त्याचा एकतरी भाग आम्ही बनवलाय असा दावा ही कम्पनी करते, त्या अनुषंगाने विमान प्रवासाची गरज वाढली आहे. बंगळूर, मुंबई, हैद्राबाद आणि दिल्लीला ये जा वाढली, रस्ते मार्गाने रात्र प्रवासात घालवणे आता वेळखाऊ ठरले, यामुळे प्रवासी आणि विमानसेवा दोन्ही वाढतील.
पश्चिम घाटात नौदल आपला दुरुस्ती प्रकल्प साकारतोय, कृषी बाजार बहरतोय, याचे परिणाम विमान उड्डाणे वाढवण्यावर होतील, यात शंका नाही.