बेळगाव ग्रामीण मतदार संघात काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या साडी वाटपावरून काँग्रेस नेत्यांत एकमेकांत बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत .लक्ष्मी हेब्बाळकर आणि सतीश जारकीहोळी यांच्या शाब्दिक युद्धात ऊर्जा मंत्री डी के शिवकुमार यांनी उडी घेतल्यानंतर त्यात पुन्हा सतीश जारकीहोळी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे
असे होते शाब्दिक बाण
सुरुवातीला या शाब्दिक बाणांची सुरुवात सतीश जारकीहोळी यांनी केली होती नाव न घेता लक्ष्मी यांच्या वर जहरी टीका करत’साड्या वाटून कुणी आमदार होत नसत’ ‘कुणी 100रुपयांच्या साड्या वाटल्या तर आम्ही 200 च्या वाटू’अस म्हटलं होतं त्याला सुळेभावी येथील काँग्रेस मेळाव्यात डी के शिवकुमार यांनी प्रत्यत्तर देत’साडीत हात घालणारा दूषयासन कोण हे सर्वांना ठाऊक आहे’ अशी बोचरी टीका केली होती .यावर टीका करताना सतीश जारकीहोळी यांनी ‘त्यांनी पण नाव घेतलं नाही मी पण नाव घेतलो नाही’अस स्पष्ट केलंय.
एकीकडे मंत्री डी के शिवकुमार, रमेश जारकीहोळी,लक्ष्मी हेब्बाळकर तर दुसरीकडे माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांची एकमेकां विरोधातील वक्तव्य पाहिल्यास विधानसभेच्या अगोदर ‘महा भारता’ची नांदणी सुरू झाली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या कर्नाटकातील महा भारतात कौरव पांडव कोण हे निवडणुकीतच स्पष्ट होईल.
भावाच्या पराभवासाठी प्रयत्न नाही
गोकाक विधानसभा मतदार संघात ‘जनता जारकीहोळी हे आडनाव पाहून मत देते त्यामुळे चिकोडी आणि बेळगाव काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करेन अस देखील स्पष्टीकरण सतीश यांनी केलं आहे. त्यांचे बंधू रमेश यांच्या पराभवसाठी प्रयत्न केला असा आरोप झाल्यावर त्यांनी पत्रकारासमोर हे स्पष्ट केलं आहे.
Tumchy vatchalivar amchya lak lak shudhechya