एका रात्रीत कार गाड्यांचा खिडकीच्या काचा फोडून तब्बल 15 कार गाड्यामधील म्युजिक सिस्टम चोरीला गेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
माळ मारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील वंटमुरी साई मंदिर भागातील तब्बल 15 कार गाड्यातून ही चोरी करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्रीचे 15 कार पकडून एका महिन्यात घरा समोर पार्क केलेल्या 22 कारमध्ये चोरी करून किंमती समान लंपास केले आहेत अशी तक्रार माळ मारुती पोलिसात देण्यात आली आहे.
रोडच्या शेजारी आणि घरा समोरील कंपाऊंड मध्ये देखील चोरी झाली आहे. सर्व चोरी करण्याची पद्धत एकच असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले असून एकाच टोळी कडून हे कृत्य झाल्याचा संशय आहे.माळ मारुती पोलीस निरीक्षक चन्नकेशव टेंगरीकर अधिक तपास करत आहेत