ऑटो नगर येथील कत्तल खाण्यात बांगला देशी मुस्लिमांच वास्तव्य आहे याची चौकशी करून रोहिंग्या मुस्लिमांच बेळगाव कनेक्शन पोलिसांनी उघड करा अशी मागणी करत भाजपच्या वतीनं निदर्शन करत रास्ता रोको करण्यात आला आहे.
उत्तर भाजपच्या वतीने संभाजी चौकात रास्ता रोको करून निदर्शन करण्यात आली तर भाजप महानगराच्या वतीने कित्तूर चनम्मा चौकात निदर्शन करण्यात आली.
हैद्राबाद येथे रोहिंग्या मुस्लिमांच बेळगाव कनेक्शन उघड झाल्याचा आरोप करत बेळगावातील बांगला देशी आणि रोहींग्याची नकली आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवण्याची टोळी पोलिसांनी गजाआड करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
पोलिसांनी तपास करून ऑटो नगर कत्तल खान्यातील बांगला देशींचा तपास न केल्यास उत्तर भाजप तपास करील असा इशारा किरण जाधव यांनी दिला आहे. संभाजी चौकात निदर्शन करत पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते