बंगळुरूसाठी दसरा हॉलिडे स्पेशल ट्रेन-सिटीजन कौन्सिलच्या प्रयत्नांना यश

0
183
Railway
 belgaum

बेळगाव हुन बंगळुरू साठी दसरा हॉलिडे स्पेशल ट्रेन दक्षिण पश्चिम रेल्वेच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे.दसऱ्याला होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने ही नवीन हॉलिडे स्पेशल ट्रेन जाहीर केली आहे.याच महिन्यात रेल्वे चीफ कमर्शियल मॅनेजर के शिवप्रसाद बेळगावला आले असता सतीश तेंडुलकर आणि सहकाऱ्यांनी भेट घेऊन दसरा दिवाळी साठी हॉलिडे स्पेशल ट्रेन सुरू करा अशी मागणी केली होती त्यानुसार दसरा सुट्टीत अतिरिक्त हॉलिडे स्पेशल ट्रेन जाहीर करण्यात आली आहे ही रेल्वे जाहीर झाल्याने सिटीजन कौन्सिलची एक मागणी पूर्ण झाली आहे आणि ऐन सणात अवाढव्य पैसे उकळणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स ना बऱ्यापैकी चाप बसणार आहेRailway

दक्षिण पाश्चिम रेल्वेच्या जन संपर्क अधिकारी इ विजया यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहिती नुसार

ट्रेन नंम्बर 06581 यशवंतपुर बेळगाव ही गाडी गुरुवारी 28 सप्टेंबर रोजी यशवंतपूर (बंगळुरू ) हुन रात्री 8:15 वाजता निघणार असून शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8:10वाजता बेळगावला पोहोचेल.

 belgaum

तर ट्रेन नंम्बर 06582बेळगाव यशवंतपुर ही ट्रेन बेळगाव हुन सोमवार 2 ऑक्टोम्बर रोजी सायंकाळी 7 :10 निघणार असून प्रयाण करेल आणि मंगळवारी 3 ऑक्टोम्बर रोजी सकाळी 6:20 वाजता यशवंतपुर बंगळुरू ला पोहोचेल. 22 डब्यांची 2 ए सी 3 टियर,22 स्लीपर आणि 2 लगेज कम जनरल डब्यांची ट्रेन असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.