व्हॉइस ऑफ इंडिया आणि तमिळ सारेगामा लिटल चाम्प मध्ये नाव मिळवलेला बेळगावचा चिमुरडा विश्वप्रसाद गणगी याने कमाल केली आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए आर रेहमान बरोबर मेर्सल या तमिळ चित्रपटात त्याने एक गाणे म्हटले आहे. इतक्या कमी वयात त्याने पार्श्वगायक होण्यापर्यंत मजल मारली आहे.
रविवारी मेर्सलच्या म्युजिक अल्बम चे लॉन्चिंग झाले, चेन्नईत हा कार्यक्रम झाला. मेर्सल ही अभिनेता विजय ची ६१ वी तर थेनेनदल फिल्म्स ने निर्मित १०० वी फिल्म आहे.
शीर्षक गीत विश्वप्रसादने गायले आहे, नरेश ऐय्यर, जी व्ही प्रकाश आणि शरण्य श्रीनिवास यांनीही आवाज दिला आहे, सुरुवातीच्या भागात विश्वप्रसाद चा आवाज आहे.
विषवप्रसाद याने गाण्यात सुरुवातीचा पार्ट गायीला आहे गेल्या तीन वर्षापासून तो संगीत क्लासात शिकत असून इटगी येथे तीन वर्षा पूर्वी पहिल्यांदा गाणं म्हटलं होतं संगीत क्लास साठी तो दररोज आपल्या घरातून 40 की मी ये जा करत असतो यामुळे त्याची संगीतावरच प्रेम तळमळ दिसून येते.