गोगटे सर्कल मधील पर्यायी नव्या रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी वाहतूक बंद करण्या अगोदर प्रथम पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली यावर जिल्हाधिकाऱ्यानी संबंधितांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं.
जिल्हाधिकाऱ्यांना आजी माजी मराठी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात शहराचं नावाचा बेळगावी असा उल्लेख केला होता आणि तो उल्लेख तब्बल 14 वेळा करण्यात आला होता. उपस्थित मराठी लोक प्रतिनिधिनी बेळगावी असा उल्लेख असलेल्या निवेदनावर सह्या केल्या आहेत. यावेळी अड अशोक पोतदार,अड नागेश सातेरी,नेताजी जाधव,मालोजी अष्टेकर किरण सायनाक, सरिता पाटील,लतीफ पठाण,रेणू किल्लेकर,शिवाजी सुंठकर,भाऊ गडकरी आदी उपस्थित होते.