‘लक्ष्मी’ने पितृमासात प्रचाराचा नारळ फोडून एकीकरण समिती आणि भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे सत्ताधारी काँग्रेसने सुळेभावी मराठी भागात आपल्या पहिल्या प्रचाराचा शुभारंभ केला. अलीकडे सुळगे सारख्या बहुल मराठी भागात आयोजित सभेत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चक्क भगवा हातात घेऊन जय महाराष्ट्राचा नारा लावला त्यामुळे मूठभर कन्नड भाषिकात त्यांच्या विरुद्ध त्यांच्या संतापाची लाट उसळली तर मराठी भाषिकात त्यांच्या या घोषणेने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कन्नड वृत्त वाहिन्यांनी मात्र या घटनेचे त्याचे चांगलेच भांडवल केले होते.
विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने हेब्बाळकर यांनी जय महाराष्ट्राचा नारा आवळून मराठी भाषिकांची मते घेण्याचा हेतू होता हेच त्यातून स्पष्ट होते. महाराष्ट्रात सामील होण्याच्या मराठी जणांच्या भावना किती तीव्र आहेत हे हेब्बाळकर यांना कळले आहे त्यामुळे यावर अधिक गजहब माजवण्याची गरज नाही त्यामुळं त्या निवडून येतील असे भाकीत करणे धाडसाचं ठरेल.एकदा जय महाराष्ट्र म्हणून लगेच माफी मागितली यामुळ बुंद से गयी ओ हौद से नहीं आती हेच खरे.
ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या व अडचणी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे ऊर्जा मंत्री डी के शिवकुमार यांचा पाठिंबा हिमालया सारखा त्यांच्या मागे ठाम उभा असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा देखील विश्वास त्यांनी संपादन केलाय .
ए आय सी सी चे चिटणीस माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बरोबर त्यांचे राजकीय मतभेद आहेत त्यामुळं हेब्बालकर यांचा धसका काँग्रेस पक्षातील अनेकानी घेतलाय तसा धसका सतीश जारकिजोळी यांनीही घेतला आहे त्यामुळेच लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष आहे. पक्षात भविष्यात त्या वरचढ ठरतील अशी भीती देखील अनेकांना सतावत आहे विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत घेतलेल्या भव्य मेळाव्यात माजी मंत्री सतीश जारकिहोळी यांची अनुपस्थिती प्रकर्षणाने जाणवली.या सर्व राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना एकीकरण समितीत सगळीकडे सामसूम आहे.फक्त स्वकीयांनीच नव्हे तर भाजप आणि समितीनेही लक्ष्मी हेब्बाळकरांचा धसका घेतलाआहे त्यामुळं सध्या तरी हेब्बाळकरांची गाडी सुसाट आहेत.