बेळगाव विमानतळ विस्तारीकरण कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित खासदार मंत्र्यांनी मोदींच गुणगान गायिल त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या भाषणात राज्याच्या विकासात केंद्रा बरोबर राज्य सरकारचा देखील तितकाच सहभाग आहे मुलभूत सुविधा देण्यात सरकार कधीच मागे पडणार नाही अस वक्तव्य केलं
बेळगावातील सांबरा येथे राष्ट्रीय विमान उड्डाण प्राधिकरणाच्या वतीने नाव्यावे विस्तारित केलेल्या विमान तळाच्या नवीन टर्मिनल बिल्डींगच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पी अशोक गजपती राजू, केंद्रीय रासायनिक खत मंत्री अनंत कुमार, उद्योग मंत्री आर व्ही देशपांडे ,उर्जा मंत्री डी के शिवकुमार,खासदार प्रभाकर कोरे ,सुरेश अंगडी महापौर संज्योत बांदेकर, आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते.कर्नाटक सरकारने विमान राज्यातील विमान तळाना जमिनीसाठी ६४८ कोटी खर्च केलेत त्यामुळे राज्य सरकारचा समान वाटा आहे असे ते म्हणाले. राज्यात फुल आणि भाजीपाला उत्पादनात बेळगाव जिल्हा आघाडीवर असून उत्तम हवामान देखील याच जिल्ह्याला लाभले आहे बेळगाव विमान तळासाठी राज्य शासनाने ३७० एकर जमिन संपादन करून दिली आहे ३६० एकर जुनी आणि ३७० नवीन अशी एकूण ७६० एकर जमिनीत हे बेळगावच विमान वसलेले असून रन वे त वाढ झाल्याने कोणत्याही क्षमतेच विमान उतरू शकेल अस देखील सिद्धरामय्या म्हणाले.
शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई
जमीन संपादना नंतर नवीन कायदा अमलात आला असून कायदेशीर प्रक्रींया पूर्ण करून सांबरा येथील शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई दिली जाईल शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही अस ठाम श्वसना मुख्यमंत्र्यांनी दिले आहे . दर दीडशे कि मी अंतरावर एक विमान तळ झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून शिमोगा विजापूर हसन आणि गुलबर्गा येथे विमानतळ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल .
कर्नाटकातील विमान तळासाठी ६२८ कोटी : गजपती राजू
नागरी विमान उड्डाण हे अधिकाधिक वाढणार क्षेत्र बनल असून कर्नाटकात विमान तळांच्या विकासासाठी तब्बल ६२८ कोटी रुपये विमान प्राधिकरणाने खर्च केले आहेत बेळगावात १४१ कोटी हुबळीत १२१ कोटी मंगळूरूत २५३ कोटी,बंगळूरू साठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, प्रवाशी हवाई वाहतुकीपेक्षा हवाई कार्गो वाहतूक वाढणार आहे . हळूहळू ऐर लायींस कंपन्या अधिक झाल्या तर विमान प्रवास तिकीट दर देखील कमी होईल हवाई सफर फक्त श्रीमंत लोक करू शकतात हि मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे अस ते म्हणाले.
महा पुरुषांचा विसर भावी पिढीला पडू नये यासाठी राज्य सरकारने राणी चन्नमा याचं नाव विमान तळाला ध्यावा याचा राज्य सरकारने करून केद्राकडे पाठवावा अशी सूचना करत स्पाईस जेट कंपनीने बेळगाव चेन्नई हवाई सेवा देऊ असा सांगितलय तर बेळगाव हून इंडिगो आणि जेट एअर वेज या कंपनीने ए टी सी कडे स्लॉट मागितला आहे अस देखील त्यांनी स्पष्ट केल.
विमान तळास राणी चन्नमा याचं नाव ध्या
खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगावातील विमान तळास कित्तूर रे चन्नमा याचं नाव ध्या अशी मागणी केली तर पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव रेल्वे स्थानकास संगोल्ली रायान्न याचं नाव ध्या शी मागणी केली.