महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक कार्यात सक्रीय सहभाग दर्शवून अनेक आंदोलनात पोवाडे म्हणणारे शाहीर गोपाळ लक्ष्मण पाटील (वय ५२ वर्षे) यांच अपघाती निधन झाल आहे. शुक्रवारी सायंकाळी इलेक्ट्रिक बिल भरून आपल्या सायकली वरून घरी परतेतेवेळी राज्य परिवहन मंडळाच्या बस ने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. गोवा वेस सर्कल जवळ हा अपघात झाला आहे.
शाहीर गोपाळ पाटील हे कोरे गल्ली शहापूर येथील रहिवासी आहेत ते प्लंबिंग काम करत होते आपल्या सायकल वरून जात असतेवेळी सायकलीची धडक बस ला झाल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. गोपाळ यांचे वडील लक्ष्मण हे देखील शाहीर होते अनेक वेळा गोपाळ पाटील यांनी समितीच्या आंदोलनातून सहभाग दर्शविला होता. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि पत्नी असा परिवार असून रहदारी दक्षिण पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे . अश्या या कट्टर समिती कार्यकर्त्यास बेळगाव live ची श्रद्धांजली