कर्नाटक सरकार घटनात्मक आणि उपलब्ध संरक्षणाचे अधिकारांचं कस हनन करत आहेत याची कल्पना देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे उपायुक्त डॉ शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांच्या सोबत बैठक ठरवावी अशी मागणी केली त्यावर शिव कुमार यांनी या संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती देऊन समिती शिष्टमंडळाने डी सी यांची भेट घ्यावी अस ते म्हणाले.
इंदू ट्रष्ट बंगळुरू विरुद्ध केंद्र सरकार या रिट पिटीशन बद्दल चर्चा करण्यात आली.यावेळी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,मालोजी अष्टेकर आमदार अरविंद पाटील,मनोहर किणेकर दिगम्बर पाटील प्रकाश मरगाळे सुनील आनंदाचे उपस्थित होते.यावेळी अड किसनराव येळ्ळूरकर,अड के बी हननुरकर,अड भुजंग बेळगोजी यांनी देखील शिवकुमार यांच्याशी चर्चा केली