रक्तदान असोत किंवा वैध्यकिय मदत असोत नेहमी अश्या प्रकारच्या समाजसेवेत अग्रेसर असणारे शहापूर भागातील सामाजिक कार्यकर्ते मधु कलंत्री यांनी एका मंदिर निर्माण कार्यास तब्बल एक लाख एक रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
बेळगाव तालुक्यातील बहाद्दरवाडी गावातील 100 वर्षाहून अधिक काळ जून असलेल्या ब्रह्मलिंग देवस्थानांच्या निर्माण कार्यास एक लाख एक रुपयांची देणगी दिली
सोमवारी बहाद्दरवाडी येथे नूतन ब्रह्मलिंग मंदिराचा खांब रोहन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात कलंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते त्यावेळी त्यांनी धार्मिक कार्यास हातभार लावला आहे.
सध्याच्या परिस्थितीत अनेक जण देणग्या जाहीर करतात आयोजकांना हेलपाटे घालायला लावतात मात्र मधु कलंत्री यांनी या सर्व प्रकारांना फाटा देत चेक द्वारे देणगी न देता कार्यक्रम स्थळीच रोख रक्कम देऊन ग्रामस्थाना सहकार्य केले आहे.कलंत्री यांच्या कार्याच सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी बहाद्दरवाडी येथील पंच मंडळी, नानु पाटील,अशोक घगवे आदी उपस्थित होते.