21 सप्टेंबर रोजी पासून गोगटे सर्कल रेल्वे उड्डाण पूल रहदारीसाठी बंद करून नवीन रेल्वे ब्रिज बांधण्यासाठी काम सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात 21 नंतर शहराच्या सामान्य माणसाच्या जीवनात ट्रॅफिक जॅम मुळे कशी समस्या निर्माण होऊ शकते यावर काय केले पाहिजेत असा सर्व आशयांचा ट्रॅफिक मॅनेजमेंट रिपोर्ट सिटीजन कौन्सिल ने जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांना सादर केला आहे.
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सिटीजन कौन्सिलचे सतीश तेंडुलकर,सेवंतीलाल शाह,विकास कलघटगी,बसवराज जवळी आदींनी एस जिया उल्ला यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हेस्कॉम,महा पालिका,रेल्वे,कॅटोंमेंट,पोलीस सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार तसच अन्य सगळ्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन सर्वांच्या सूचना सल्ला घेऊ मगच त्यानंतर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
सिटीजन कौन्सिल ने बनवलेल्या ट्रॅफिक मॅनजमेंट रिपार्ट मध्ये 21 सप्टेंबर पासून गोगटे सर्कल ब्रिज रहदारी साठी बंद केल्याने शहरात कशी परिस्थिती निर्माण होऊ शकते याच सविस्तर विश्लेषण करण्यात आलं असून कोणत्या पद्धतीने जिल्हा प्रशासनाने उपाय योजना केल्या पाहिजेत या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. गोगटे सर्कल ब्रिज हा उत्तर बेळगाव आणि दक्षिण बेळगावला जोडणारा महत्वपूर्ण दुवा असून लाखो लोक या वर निर्भर आहेत.उत्तर बेळगावात सामान्य माणसाला लागणाऱ्या 28 शाळा,कॉलेजिस, मोठे फळ फुल भाजी मार्केट,सिनेमागृह,सरकारी कार्यालये, आहेत.या ब्रिज वरून वडगांव अनगोळ टिळकवाडी येळ्ळूर भागातील सकाळ सायंकाळ 60 फेऱ्या होत असतात. दररोज 3 हजार ऑटो रिक्षा,शेकडो टमटम आणि 25 लक्जरी बसेस फिरत असतात.दक्षिण भागातून उत्तर भागात हॉस्पिटल इमर्जन्सी एबुलन्स येण्यासाठी वेळ लागू शकतो त्यामुळे धोका बसण्याची शक्यता आहे ही सगळी माहिती रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
बेळगाव शहरात आधीच स्मार्ट सिटीच काम सुरू असल्याने अनेक रस्त्यावर खड्डे खुदाई करण्यात आली आहे त्यातच जुने पी बी रोड काम देखील सुरू आहे अश्यात सामान्य बेळगावकर प्रचंड तणावात आहे लोकांना त्रास होऊ नये यावर तोडगा काढणे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे याची कल्पना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे अशी माहिती सतीश तेंडुलकर यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे