विध्यार्थ्यानी मातृभाषेतून शिक्षण घेतलं इंग्लिश ला घाबरून जाण्याच कारण नाही फक्त संघर्ष करणे अटळ आहे त्यामुळं मेहनत संघर्ष केल्यास यश निश्चित आहे,धाडसाने विध्यार्थ्यानी यु पी एस सी एम पी एस सी ला सामोरे जावे असे आवाहन हुपरी कोल्हापूर येथील स्पर्धा परीक्षा समनवयक प्रा डॉ संदीप किर्दते यांनी व्यक्त केलं.
क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीनं चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात आयोजित मराठा समाजाच्या गुणवन्त विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. बेळगाव परिसरात एस एस एल सी आणि इतर परिक्षात यश मिळवलेल्या 165 विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
यावेळी क्षत्रिय मराठा परिषद अध्यक्ष अनिल बेनके,महापौर संज्योत बांदेकर,उद्योजक राजेंद्र मुतगेकर,अड सुधीर चव्हाण,ए सी पी शंकर मारिहाळ उपस्थित होते.
जीवनात अकादमीक शिक्षण तर महत्वाचे आहेच याशिवाय बाहेरील तुमची वागणूक कशी आहे त्याच्यावर देखील तुमचं यशापयश अवलंबून आहे बऱ्याचदा तुमच्या कडच कौशल काय आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे मुतगेकर म्हणाले.
यावेळी राष्ट्रपती पदक मिळाले म्हणून ए सी पी शंकर मारिहाळ,आदर्श शिक्षक पुरस्कार।प्राप्त बेनके, खो खो प्रशिक्षक वंदना पाटील,आदींचा देखील सत्कार केला गेला