अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून पुरण्याचा प्रयत्न केलेल्या नरधामास कारागृहात कैद्यांनी चांगलाच प्रसाद दिला आहे . अनेकदा बेळगावातील कैद्यांनी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना झाल्या नंतर कैद्यांना मारहाणी केल्या आहेत.
आरोपी सुभाष नायक यास शनिवारी हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आल होत त्यावेळी अत्यंत निर्दयीपणे चिमुरड्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जाब विचारत या घटनेचा कैद्यांनी निषेध देखील केला मारहाण देखील केल्याची माहिती मिळाली आहे.
या मारहाणी नंतर आरोपी सुभाष नायक यास वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आली आहे.
पीडित बालिकेवर बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून ती जीवन मरणाच्या उंबरठ्यावर आहे.