सर्व समावेशक भूमिका घेऊन सर्वानी एकत्रित रित्या विधानसभेस सामोरे जाऊ अशी सामंजस्याची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना अरेरावी करण्याची घटना तालुका समितीच्या कॉलेज रोड मधील कार्यालयांत घडली आहे. विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या जागा निवडून आणण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करू अशी भूमिका मांडणाऱ्या भागोजी पाटील यांच्यावर सुळगा (हिंडलगा) ग्राम पंचायतीचे अध्यक्ष संजय पाटील यानी अरेरावी केली आहे .
याबाबत समजलेल्या माहितीनुसार नेहमी प्रमाणे दररोज दुपारी भागोजी पाटील हे कॉलेज रोड वरील ग्रामीण समिती कार्यालयात गेले असता संजय पाटील यांनी तुमचा समितीशी काय संबंध ? तुम्हाला उमेदवारी मागण्याचा अधिकार नाही आम्ही म्हणेन तीच पूर्व दिशा म्हणत भांडण उकरून काढले दोघात बराच काळ तू तू मैं मै झाली . या अगोदर देखील बेळगाव live ने ग्रामीण काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असलेल्या नेत्यांच्या यादीत संजय पाटील यांचं नाव जाहीर केलं होत. मात्र तरी देखील या कार्यकर्त्याने बाईचा नाद सोडून मराठी आस्मितेकडे येण्याऐवजी एकीची सर्वसमावेशक भाषा करणाऱ्या भागोजी पाटील यांच्याशी अरेरावी केल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत . सदर घटना हेकेखोर नेत्याच्या समक्ष घडल्याने संजय पाटील याना समज देण्याऐवजी मूग गिळून गप्प बसण्यातच त्या नेत्याने धन्यता मांडली होती याचा बोलविता धनी कोण याची देखील चर्चा चालली होती.
गेली दहा वर्ष ग्रामीण भागात समितीच्या मराठी भाषिकाचा दुही मुळे पराभव होत आहे त्यामुळे इच्छुक असलेल्या त्या हिंडलगा आणि कणबर्गी येथील दोघांना नारळ येऊन नव्या दमाचा उम्मेदवार द्या अशी मागणी सर्वत्र होत असताना हेकेखोर नेत्याने पुन्हा आपणच पुढे अशी भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती होईल अशी देखील चर्चा सुरु आहे. भागोजी पाटील देखील भाजप मधून समितीत आलेत संजय पाटील कल्लेहोळ हे समिती नेते आणि हेब्बाळकर यांच्यातील दुवा बनले आहेत त्यामुळं दोघांनीही सामंजस्य पणे वागणं गरजेचे आहे.