Monday, December 23, 2024

/

एक लिटर पाणी बाटलीची किंमत 50 रुपये

 belgaum

WAterपिण्याच्या पाण्याची बाटली एम आर पी पेक्षा अधिक किंमतीत विकल्याने शहरातील सर्व मॉल वर धाड मारून कारवाई करून केवळ काही दिवसातच पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची बाटली 50 रुपयांना विकली जात आहे. न्यूक्लियस मॉल मध्ये एक लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच बिल 50 रुपये विकली जात आहे . Mrp पेक्षा अधिक किंमतीने खाध्य पदार्थ विकणाऱ्या सिनेमा घरातील फूड कोर्टवर कारवाई करून अवघे काही महिने उलटले आहेत .2009 चया मेट्रोलॉजी ऍक्ट अनुसार एकच पदार्थ वेगवेगळ्या एम आर पी ने विकणे गुन्हा आहे. केंद्रीय खाध्य मंत्री रामविलास पासवान यांनी देखील एकच पदार्थ वेगवेगळ्या किंमतीत विकणे गुन्हा आहे असं ट्विट केलं होतं मात्र 20 रुपये लिटर विकली जाणारी पाणी बाटली न्यूक्लियस मॉल मध्ये 50 रुपये लिटर विकली जात आहे. या मॉल मध्ये विक्री केलेल्या पाणी बाटली वर देखील एम आर पी 50 रुपये लिहिलेलं आहे. मॉल प्रशासनाची नवीन चालाखी तर नाही ना?असा प्रश्न विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.