Monday, December 23, 2024

/

आरोपीने पोलिसाच्या कानशिलात लगावली

 belgaum

POliceसंशयित आरोपी असलेल्या एकाने भर कोर्ट आवारातच पोलिसाच्या कानशिलात लगावल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन आले असता त्याने हा प्रकार केला. त्यामुळे जेएमएफ द्वितीय न्यायालयासमोर एकच गोंधळ उडाला होता न्यायालयात गेल्यानंतर मात्र आपण काहीच केले नसल्याचे सांगत त्याने न्यायाधिशांसमोर माफीचे नाटक केले. माळ मारुती  पोलिसांनी धारवाड येथे अटकेत असलेल्या नितीन दाबले नावाच्या कुख्यात गुन्हेगाराला बॉडी वॉरंटद्वारे चौकशीसाठी बेळगावात आणले आहे. मुंबई, कोल्हापूर, ठाणे व महाराष्ट्रात अन्य ठिकाणासह कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर सुमारे 23 हून अधिक गुन्हे आहेत. कोकासह खून, खुनी हल्ला, खंडणी, हाणामारी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याला यापूर्वी अटक झाली आहे. बेळगाव परिसरातील माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीतही त्याने काही गुन्हे केल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याची चौकशी सुरू आहे.

चौकशीनंतर आज दुपारी एकच्या सुमारास त्याला माळमारुती पोलीस ठाण्याच्या पथकाने न्यायालयात हजर केले. जेएमएफसी द्वितीय न्यायालयासमोर त्याला घेऊन माळमारुती ठाण्याचे चार पोलीस थांबले होते. यावेळी नितीन हा मोठमोठ्याने बोलत होता. एस. एम. मुदकन्नवर नावाच्या पोलिसाने त्याला शांत बसण्यास सांगितले. परंतु, तो शांत न होता अधिकच जोराने बोलू लागला. त्यामुळे त्याला रागाने गप्प बसण्याची सूचना केली. याच रागातून नितीनने चक्क पोलिसाच्या कानशिलात लगावली.घटनेची माहिती कळताच मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर घटनास्थळी पोचले होते या यॉर्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.