यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकाऱ्यांना त्रास दिल्या प्रकरणी तीन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 6 सप्टेंबर रोजी बेळगाव शहरात तब्बल 24 तास विसर्जन मिरवणूक चालली होती पालिसांना आपली ड्युटी कर्तव्य निभावण्यास अडथळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनगोळ येथील एक मंडळात विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल वर अज्ञात युवकाने चाकू हल्ला करून जखमी केले आहे.फनिराज के एन उडुपी अस या पोलीस कॉन्टेबलच नाव आहे.या प्रकरणी टिळकवाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका केस मध्ये पोलिसांना वादावादी केल्या प्रकरणी उमेश कुरीहाळकर संदीप लटुकर संभाजी जाधव गुरू येळ्ळूरकर, सौरभ परमाज, रोहित पाटील सदानंद येळ्ळूरकर,विशाल बिरजे भावेश बिरजे,बबन मुटगेकर,परशराम नलवडे,बसवरज पाटोल आदी वर टिळकवाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आणखी एक केस मार्केट पोलीस निरीक्षक अरुण नागेगौडा यांना आपली ड्युटी निभावण्यास अडसर केल्याचा ठपका ठेवत खडक गल्लीतील काही युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अनेक युवकानी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले मार्गदर्शक तत्व न पाळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.