Wednesday, December 25, 2024

/

जखमी विश्वनाथ पाटील यांना उपचारासाठी मिरजेत हलवले

 belgaum

शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विश्वनाथ पाटील(नेहरू नगर) यांना  गणेश उत्सव विसर्जन मिरवणूकित झालेल्या मारहाणीत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना मिरज सांगली येथे भर्ती करण्यात आले आहे.

मंगळवारी मध्यरात्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असता गणपत गल्ली भागात त्यांना मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली पायाच्या असून उपचारासाठी त्यांना  मिरज येथे हलविण्यात आले आहे.
बऱ्याच कारणांनी यावर्षीची विसर्जन मिरवणूक वादग्रस्त ठरली असून अनेक जणांच्या मारामाऱ्या  वाद असे प्रसंग या मिरवणुकी दरम्यान घडले आहेत.वयक्तिक राग गणेश विसर्जन मिरवणुकीत काढणे मिरवणूक विलंब करणे अश्या प्रकार मुळे आम्ही उत्सवाचं गांभीर्य हरवत आहोत की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.