माजी आमदार अभय पाटील यांच्या विरोधात दाखल भ्रष्टाचार प्रकरणातील तक्रारी प्रकरणी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते सुजित मूळगुंद यांनी कोर्टात आपले अफिडेवीट सादर केले. आपण दाखल केलेली तक्रार रद्द झाली नाही तर सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले.
अभय पाटील हे सलग दोनवेळा आमदार झाले, याकाळात त्यांनी मोठी रक्कम आणि मालमत्ता जमवली आहे. स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावाने ती माया ठेवली आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून इतकी मोठी संपत्ती जमविणे योग्य नाही, हा भ्रष्टाचार व पदाचा गैरवापर आहे, यासाठी २०१२ साली आपण कोर्टात खासगी तक्रार दाखल केली आहे, असे त्यांनी सांगितले.
याप्रकारच्या तक्रारीत तक्रारदाराने अफिडेवीट सादर करणे उच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे, आपण ते न केल्याने स्थानिक कोर्टाने दिलेले चौकशी आदेश रद्द करून कोर्टाने मला अफीडेवीट सादर करण्याची सूचना केली होती, ती सूचना मान्य करून आपण प्रक्रिया पूर्ण केली आहे, आता कोर्टाने लोकायुक्त पोलिसांना पुन्हा चौकशी आदेश देण्याची विनंती आपण करणार आहे असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले.
मूळगुंद यांच्या वतीने वकील शरद मुंडरगी काम बघत आहेत