Monday, December 23, 2024

/

योगेश बनणार इंजिनियर मिळाली सर्व थरातून मदत

 belgaum

Patrkarसरकारी कोट्यातून फ्री सीट मिळून सुद्धा पाहिल्या टप्प्यात केवळ गरिबीमुळे  परवड झालेल्या योगेशच ऑटोमोबाईल इंजिनियर बनण्याचं स्वप्न आता साकार होणार आहे.योगेश ला दुसऱ्या टप्प्यात कौन्सिलिंग मध्ये बंगळुरू येथील आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्याला सरकारी कोट्यातून अडमिशन मिळालं आहे.
सर्वप्रथम बेळगाव live ने केलेल्या आवाहना नंतर त्याला अनेक सामाजिक संस्था,गणेश मंडळ आणि अनेकांनी वयक्तिक रुपात मदत दिली आहे. आतापर्यंत योगेशला जवळपास 70 हजार रक्कम जमली आहे यात अनेकांचा सहभाग आहे.पत्रकार विकास अकादमीचे विश्वस्त जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या पुढाकारातून या गरीब विधयार्थ्यांला  मदत मिळवून देण्यात आली आहे.

मंगळवारी सकाळी पत्रकार विकास अकादमीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात 15 हजार ची रक्कम मराठा समाजाचे गुणवन्त पाटील यांच्या हस्ते मदत दिली यावेळी पत्रकार विकास अकादमीचे सचिव प्रसाद प्रभू ,प्रसाद पाटील,रमेश हिरेमठ,कामत आदी उपस्थित होते.अजूनही त्याला 15 ते 20 हजारांची गरज आहे ती रक्कम पण लवकर मिळेल अशी माहिती मिळाली आहे.

योगेश ला खालील लोकांनी मदत दिली आहे.
प्रसाद पाटील 2000
नारायण सावन्त 1000
प्रकाश मरगाळे 1000
चेतन कुलकर्णी 500
राजाराम सूर्यवंशी 500
रमेश हिरेमठ 500
अशोक चिंडक 2500
संजय झंवर 2500
नेताजी जाधव 2000
काकडे फौंडेशन 1000
नरगुंदकर भावे चौक गणेश मंडळ  आणि वयक्तिक अशी 2600
मराठा बँक 2500
बिचू गल्ली शहापूर मंडळ 1000
सुजाता ड्रेसेस 1100
आर आय पाटील (समिती)5000
ज्योती कॉलेज एक  प्रोफेसर 2500
यल्लपा काकतिकर 1000
आप्पासाहेब गुरव उधमबाग 5000
सुनील पाटील मुंबई 12000
आणखी एक डोनर 1000
तर टिळकवाडी येथील गणेश मंडळ नगरसेवक पंढरी परब यांचं गणेश मंडळ 25000 देणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.