मार्कंडेय नगरातील गणपतीचं देखील कपिलेश्वर तलावात विसर्जन केले जाणार असून बदलेल्या मार्गाची अधिकृत परवानगी सोमवारी या मंडळांना मिळणार आहे.
मार्कंडेय नगरातील गणेश मंडळ दरवर्षी मार्कण्डेय नाल्यात विसर्जन करत होते मात्र या वर्षी या नाल्यात ड्रीनेज पाणी आहे त्यातच या मंडळांनी दहा फुटी उंचीची शेडूची मुर्ती साकारली आहे त्यामुळे यावर्षी या मंडळांना कपिलेश्वर तलावात गणपती विसर्जनास परवानगी द्या अशो मागणी केली असता सुरुवातीला पोलिसांनी नाकारली होती मात्र गणेश महा मंडळाच्या पुढाकारातून ही परवानगी उध्या मिळणार आहे.
महा मंडळाचे जन संपर्क प्रमुख विकास कलघटगी गणेश दड्डीकर यांनी पोलीस आयुक्ताना भेटून याबाबत पाठ पुरावा केला यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी संवेदनशील मार्गातून मिरवणूक नसल्याने इतर कारणामुळे हँड गणपती देखील मुख्य मुरवणुकीत सहभागी होऊ देत असा हिरवा कंदील दिला आहे
शाहूनगर मार्कंडेय नगरातील गणपती ए पी एम सी मार्केट, नेहरू नगर चनम्मा चौक कॉलेज रोड मार्गे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.