प्रेम करून घरातून पलायन केलेलं एक जोडपं आमचं लग्न करा या मागणीसाठी बेळगाव पोलिसांच्या शरण गेलं आहे.
आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आम्हाला न्याय मिळाला नाही तर विष सेवन करून आत्महत्त्या करून असा इशारा देत हातात विषाची बाटली घेऊन पोलीस आयुक्त कार्यालया समोर आंदोलन केलंय.
गोकाक तालुक्यातील भारती गुडगेनहट्टी आणि बेळगाव येथील राघवेंद्र हिरेमठ गेल्या पाच वर्षां पासून एकमेकांवर प्रेम करतात लग्न करायची त्यांची इच्छा आहे भारती च्या घरच्यांचा त लग्नास विरोध आहे त्यांनी भारतीच लग्न एक नातलगा सोबत लावून दिल आहे.मात्र भारती ला हे लग्न मान्य नसून जबरदस्ती घरच्यांनी विवाह केला असल्याचा आरोप करत आपण राघवेंद्र बरोबर विवाह करू अस मत तिने पोलीस अधिकाऱ्या समोर मांडलं आहे. माझं लग्न राघवेंद्र सोबत करा अन्यथा विष पिऊन जीव देऊ असा इशारा भारती देत होती.
गेल्या चार दिवसांपूर्वी पासून भारती आपल्या पतीच्या घरातून पलायन करून राघवेंद्र सोबत राहत आहे भारती च्या घरच्या मंडळींनी राघवेंद्र विरोधात यमकनमर्डी पोलिसात अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे त्यामुळं भारती आणि राघवेंद्र यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून रक्षण करण्याची विनंती केली आहे.