आजच्या जगातील विशिष्ट मानसिक ताणातून आपली लहान मुलंसुध्दा सुटली नाहीत. पालक, घरातील मंडळी जर मानसिक तणावातून जात असतील तर मुलं तरी कशी अपवाद राहतील! त्यांच्यापर्यंत काहीना काही पोहोचतच असतं. काही मुलं उपजतच अतिसंवेदनशील असतात. काही मुलं जात्याच भित्री, जात्याच जरा उदास असतात. अशा संवेदनशील मनांवर एकतर आघात होऊ देऊ नयेत, तसेच त्यांना हळूवार उमलू द्यावं. अर्थात हे सर्व पालकांवरही खूप अवलंबून असतं. कधीकधी नकळत मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि असे विकार वाढीस लागतात.
भीती आणि काळजी (अपुळशींू वळीेीवशी) – भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळाबद्दल अवास्तव चिंता, काळजी करणं, अनावश्यक भीती, असुरक्षितता, तणावात राहणं यांचा प्रकारात समावेश होतो. अशा मुलांना एकटं राहण्याची, अंधाराची, भुताची अतिशय भीती वाटते. अर्थात सर्वच मुलांना थोडीफार भीती वाटत असते. अर्थात सर्वच मुलांना थोडीफार भीती वाटणं साहजिक आहे. परंतु या मुलांना अतिशयच भीती वाटत असते. सारखं आईच्या मागं मागं राहणं, बेचैन राहणं, तोतरं, त्रोटक बोलणं, हातातून वस्तू सारख्याच पडणं, आत्मविश्वासाचा अभाव असा प्रकार या मुलांच्या बाबतीत होऊ शकतो. घर सोडून अगदी शाळेला जायलासुध्दा ही मुलं तयार नसतात. स्वतःचीसुध्दा कामं करायला जमत नाहीत.
पालकांचा पुरेसा वेळ न मिळणं, चुकीच्या कल्पना, चुकीची माहिती, अवास्तव शिक्षा, आईवडिलांकडून, घरातील मंडळीकडून अकारण तुलना, मारबडव अशा कारणांमुळेही मुलं भेदरल्यासारखी वागतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अशा विकारांमध्ये समुपदेशन पालकांचे समुपदेशन व होमिओपॅथी औषध उपचार यांच्याव्दारे उत्कृष्ट परिणाम साधता येतो.
नैराश्य- असं वाटणे साहजिक आहे की एवढ्याशा मुलांना कसलं आलं आहे नैराश्य! परंतु आजकाल या विकाराचं मुलांमध्येही प्रमाण वाढत आहे. अति खाणे, अजिबात न खाणे त्यामुळे शारीरिक आजार, आक्रस्ताळेपणा, उदासीनता, अभ्यासात मागे पडणे, एकच गोष्ट वारंवार करत राहणे, चीडचीड, रडवेपणा ही सगळी एक प्रकारच्या नैराश्याची लक्षणेच तर आहेत. पालकांचा विसंवाद, पालकांमधील नैराश्य अथवा मानसिक विकार यामुळे मुलांवरही वाईट परिणाम होऊ शकतो. अतिकृश अथवा अतिलठ्ठ मुलांमध्ये इतर शारीरिक अनारोगायाबरोबर मानसिक आरोग्यही पडताळून पहावे लागते.
पालकांचा घटस्फोट, पालकांचा मृत्यू पालकांमधील मानसिक विकृती, जुनाट आजारपण, पंगुत्व, शिकण्यासाठी घराबाहेर ठेवणे, मोठा मानसिक धक्का अशा कारणांमुळे मुलांना नैराश्य येऊ शकते, या विकारात देखील कौटुंबिक समुपदेशन आवश्यक असते. तसेच होमिओपॅथीक औषधान्वये दुष्परिणाम विरहित उपचार करता येतात.
फोबिया- किटक, प्राणी, व्यक्ती, शाळा, इंजेक्शन, इतर काही गोष्टी यांच्याबद्दल तिटकारा व अतिशय भीती निर्माण होणे यालाच फोबिया म्हणतात. यामुळे अशा गोष्टींचा संपर्क आला की मूल घाबरून बेशुध्दसुध्दा पडू शकतं. शाळेचा तिटकारा हा सर्वात कठीण विकार आहे. त्यावर सातत्यानं समुपदेशन शाळेतील शिक्षकांच्या सहयोगानं उपचार व पालकांचा उपचारामधील सहभाग यासह होमिओपॅथिक औषधांनी आवश्यक गुण येऊ शकतो. फोबियामागचं कारण शोधून काढणं फार महत्वाचं असतं. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणं कधीही योग्य!
हिस्टेरिया- हा एक विशिष्ट विकार आहे यामध्ये रूग्णाला काहीही होत नसतं. फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी मुलं अजाणतेपणीच असा काहीतरी मोठा त्रास होत असल्याचा आवर्भाव आणत असतात. डोकं दुखतं, पोट दुखतं म्हणून गडाबडा लोळणं, चक्कर येऊन पडणं, बेशुध्द पडण्याचं नाटक करणं अशा गोष्टी यात दिसून येतात. अगदी डॉक्टरांनासुध्दा चक्रावून टाकणारा हा विकार आहे. खरंच असं होत आहे, का खोटं आहे याची शहानिशा करण्यातच बराच वेळ निघून जातो. पण हे सगळं एक नाटक असतं.
तोवर डॉक्टरांची व पालकांची कसोटी लागते. सगळ्या टेस्ट, सगळी औषधं होतात मग सर्वांच्या लक्षात येतं यासाठी होमिओपॅथीशिवाय कोणतेच इतर उपचार लागू पडत नाहीत. कारण मानसिक विकारांवर दुष्परिणाम विरहित रिझल्टस् फक्त होमिओपॅथिच देते. इनफंटाईल ऑटीझम (अणढखडच) हा विकार मूल दोन ते अडीच वर्षाचे झाल्यावर आढळून येतो. आजूबाजूच्या जगाशी या बालकांचा जवळजवळ संपर्क नसतो. अर्थहीन बोलणं, एकच एक गोष्ट वारंवार करत राहणं, आपल्याााच शरीराशी चाळा करणं, सुन्न बसून राहणं अशी लक्षणं दिसून येतात. ही मुलं खेळण्यातच रमतात. पालकांशीही ओळख नसल्यासारखी वागतात. यावर विशेष कोणतेच उपचार उपलब्ध नाहीत. परंतु वेळीच हा विकार ओळखून अशा विकारांवर उपचार करता येते.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364