निपाणी येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून जाणारे दोघेजण संरक्षक कठड्याला आदळून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
शिवाजी लक्ष्मण मोदगेकर,काजल राजू मोदगेकर अशी दोघा मृतांची नावे असून दोघे बसरीकट्टी गावचे रहिवाशी असून भाऊ बहीण आहेत.निप्पणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.