द्राक्ष रस महामंडळा च्या वतीनं आयोजित बेळगावातील पाचव्या आंतरराष्ट्रीय वाईन फेस्टिव्हल ला थाटात उदघाटन टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन मध्ये करण्यात आले
संगीत वाद्यांच्या गजरात मिलेनियम गार्डन मधल्या वाईन फेस्टिव्हल उदघाटन कार्यक्रमाची मजा आगळीच होती. गणेश वंदना आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.12 विविध स्टॉल मध्ये असलेले वाईनचे प्रकार -डोमिनो,रिको ,कृष्णा व्हॅली,एलमेर्ट,व्हॉइस्पोर्ट,रास्नो वाईन,चोपण,ग्रोव्हर चंपा,मधूलोक,फ्राटेली,सुला,स्टुडिसर्वा, व्हेलकडी इंडिज या ब्रँड च खास आकर्षण आहे.
माजी मंत्री सतीश जारकीहोळी,आमदार गणेश हुक्केरी,अबकारी आयुक्त मंजुनाथ,द्राक्षे रस महा मंडळ चे अध्यक्ष शंकर मिरजी,सचिव टी सोमु, फलोत्पादन उप संचालक इब्राहिम इब्राहिम दोडमनी आदी उपस्थित होते.