Thursday, March 28, 2024

/

बेळळारी नाला अतिक्रमण कायदा प्राधिकरणाकडे दाद

 belgaum

बेळळारी नाला अतिक्रमण कायदा प्राधिकरणाकडे दाद
बेळळारी नाला अतिक्रमण प्रकरणी शेतकऱ्यांनी आता बेळगाव जिल्हा कायदा प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे.
शुक्रवारी दुपारी शेती बचाओ समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे एक शिष्टमंडळ कायदा सेवा प्राधिकारचे न्यायाधीश किरण किणी यांना भेटून नाला अतिक्रमणाची निवेदना द्वारे  तक्रार केली.

Bgm bellari nala
हलगा बेळळारी नाल्यात 30 फूट महेंद्र धोंगडी नावाच्या व्यक्तीने अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे तहसीलदार पोलिस अधिकारी महापालिका जिल्हाधिकारी आणि आमदाराकडे तक्रार करून देखील अध्याप काम थांबलेलं नाही आहे अनेज अधिकारी आणि आमदारानी घटनास्थळी पाहणी करून देखील अतिक्रमण सुरूच आहे.तलाठी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या अहवाला नुसार अतिक्रमण होत आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळं या प्रकरणी हस्तक्षेप करून काम थाम्बवा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी शेती बचाव समिती राजू मरवे,ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर,भ्रष्टाचार निर्मुलन समिती चे सुजित मुळंगुद, साजिद सय्यद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.