Wednesday, January 15, 2025

/

धर्मवीर संभाजी महाराज चौकात पुतळ्यासमोर स्वीटकॉर्न!

 belgaum

शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असेलेला धर्मवीर संभाजी महाराज चौक म्हणजे शहराची शान आहे , प्रत्येकाला या ठिकाणी येताच संभाजी राजांचे दर्शन होते आणि प्रत्येकाचा ऊर भरून येतो आणि मोठया अभिमानाने आपण शहरात खरेदी करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी प्रवेश करतो , पण गेल्या काही दिवसांपासून या चौकाला फेरीवाले , प्रवाशी टेंम्पो चालक , आणि इतर लोकांनी विळखा दिल्यामुळे या चौकातील धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा दिसत नाही , त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.DScहदारी पोलीस बाजार पेठ मधील फेरीवाल्यांना हटविण्याचा प्रयत्न करतात , पण शहराची शान असलेल्या धर्मवीर संभाजी चौकातील फेरीवाल्यांना आणि खाजगी वाहन धारकाना कोण समज देणार हा प्रश्न निर्माण होत आहे . येथील परिस्थितीबाबत अनेक नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांना जाणिव आहे तरीही मनपा व प्रशासन देखील या कडे कानाडोळा का करीत आहे असा प्रश्न निर्माण होत असून संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील अडथळे न हटविल्यास शहरवासीय शांत बसणार नाहीत असा इशारा देण्यात येत आहे.
मनपाने याची त्वरित दखल घेऊन धर्मवीर संभाजी महाराज चौकात थांबणाऱ्या फेरीवाल्याना व प्रवाशी वाहतूक करणार्यांना समज द्यावी अशी मागणी होत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.