बेळगाव शहरातील प्रथम दर्जाच्या महिलाकॉलेजमध्ये मूलभुत सुविधा पुरवा अशी मागणी करत विध्यार्थीनींनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं.
कॉलेज पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. महिला कॉलेज साठी नवीन इमारत निर्माण करा यासाठी राज्य सरकार ताबडतोबड अनुदान मंजूर करावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
महिला कॉलेज मध्ये नवीन शौचालय निर्माण करा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करा तसच ग्रंथालय सुरू करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.