सध्याचे महादेव आरकेड असलेल्या ठिकाणी जुन्या कलघटगी चाळीत १९५८ साली या मंडळाच्या उत्सवाला सुरवात झाली. जायप्पा कूटरे, पडियार देसाई, बी ए जाधव, बाबुराव आढाव, बी जी नवले, किसन उचगावकर, नंदू पठाणे, बंडू कंग्राळकर, वि पी कित्तूर, डी एस अंगडी, अशोक उप्पीन हे या मंडळाचे सुरुवातीचे कार्यकर्ते.
जायप्पा कुटरे यांचे किराणा तसेच आयुर्वेदिक औषधांचे दुकान होते. त्यातून आलेला पैसे एक डब्यात साठवून ते मंडळाला देत. राजनावर हे आपल्या मीटर मधून रोषणाईसाठी वीज देत असत.
अनेक विधायक उपक्रम या मंडळाने केले आहेत. गरजू युवकांना मदत, शिक्षणासाठी मदत तसेच आरोग्यसेवांसाठी पूर्वीच्या काळापासून मंडळाचे कार्यकर्ते झटत आले आहेत. लोकमान्यांची विधायक उत्सवाची परंपरा या मंडळाने जपली आहेत
खंजर गल्ली हिंदू पंच मंडळ, छत्रपती युवक मंडळ व प्रगती महिला मंडळ या मंडळात कार्यरत आहे.
यंदाचा सुवर्णमहोत्सव अतिशय उत्कृष्टपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.