धर्मवीर संभाजी चौकात संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोर दररोज रात्री होत असलेल फेरी वाले,पॉप कॉर्न गाड्यांचा ,टेम्पो आदि अडथळ्यांना हटवण्यात आलं आहे.महा पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकांन धडक कारवाई करत शनिवारी रात्री हे अडथळे हटविले आहेत.गेले अनेक दिवस फेरी वाल्यांच्या विळख्यात संभाजी चौक अडकला होता.
पालिका अधिकारी नाडगौडा यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे अर्जुन देमट्टी यांनी कारवाई करत फेरी वाल्याना हटवला आहे. गेल्या 16 आगष्ट रोजी बेळगाव live ने संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोर पॉप कॉर्न विक्री अशी बातमी प्रसिद्ध केली होती यानंतर शिवबप्रतिष्ठांन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटविण्याचा प्रयत्न केला होता तरी देखील फेरी वाले पॉप कॉर्न वाल्यांची मुजोरी सुरूच होती.माजी महापौर सरिता पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून संभाजी चौकाला फेरी वाल्यांचा विळखा असलेला दूर करण्यास मदत केली आहे.
Trending Now