सैन्य दलात निर्णय घेणाचे अधिकार अधिकाऱ्यांना देणे गरजेचे जेणे करून राजकीय हस्तक्षेप कमी करता येइल अस मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले आहे.बेळगावातील आय एम ई आर सभागृहात भारताची सुरक्षा व्यवस्था या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष डॉ राहुल साठे,सचिव के व्ही संजय,प्रांत्पालानंद कुलकर्णी,इव्हेंट चेअरमन डी बी पाटील उपस्थित होते.
देशाची सध्याची संरक्षण व्यवस्था भक्कम असून संरक्षण मंत्र्या एवजी निर्णय अधिकार सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यास त्याचा फायदा देशाला अधिक होईल सैन्यदलाचे मनोबल वाढेल .युद्ध क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी भारतीय सेनेने अत्याधुनिक शस्त्रे विकसित करण्यावर भर दिला पाहिजे असेही ते म्हणाले.
आजच्या घडीला लोकप्रतिनिधी आणि संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यात अधिक समन्वयाची गरज आहे ते देशाच्या हिताचे ठरणार आहे असे सांगत लष्कर,वायुसेना आणि नेवी या तिन्ही दल आपत्कालीन काळात कायम मदतीसाठी सज्ज असतात सेवा देत असतात त्यामुळे या तिन्ही दलात देखील योग्य समन्वय हवा अस देखील त्यांनी नमूद केल.
भारताची सध्याची सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम असून युद्धासाठी कोणत्याही देशाच्या धमकीला घाबरण्याची गरज नाही अस स्पष्ट केल. यावेळी भारत चीन भारत पाक युद्धाची माहिती दिली.