आजकाल शिक्षणात भरपूर स्पर्धा आहे त्यामुळे या स्पर्धात्मक युगात टिकणारे विध्यार्थी घडवा असा सल्ला उद्योग मंत्री आर व्ही देशपांडे यांनी दिला आहे.
टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी कॉलेजच्या स्थापना दिना निमित्य कार्यक्रमात कॉलेजचे माजी विद्यार्थी या नात्याने बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान एस के इ संस्थेचे सेवांतीलाल शाह यांनी भूषविले होते.कॉलेजने पुणे बंगळुरू येथील कॉलेजशी स्पर्धा करू नये तर इथे तयार होणारे विध्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळी वर चमकतील स्पर्धा करतील असे विधयार्थी घडवा अस देखील ते म्हणाले. यावेळी एस के ई संस्थेचे आर डी शानभाग,तरुण भारत आणि लोकमान्य समुह प्रमुख किरण ठाकूर,राणी पार्वती देवी यांचे वंशज सावंतवाडीचे राजे लखम भोसले राजे,आदी उपस्थित होते.कर्नाटकात आय टी बी टी उच्च शिक्षणासाठी देशविदेशातून शिकण्यासाठी अनेक विधयार्थी येत असतात राज्य सरकार ने शिक्षणा साठी भरपूर सुविधा पुरविल्या आहेत कर्नाटक एक शैक्षणिक हबब बनलं आहे असं देखील देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
सावंतवाडीचे राजे लखम भोसले म्हणाले की आमच्या पूर्वजांनी शिक्षणाचं उद्देश्य समोर ठेऊन ही संस्था उभारली आहे इथे असच कार्य चालत राहील पाहिजे असं सांगत राणी पार्वती देवी यांचा आईच
इतिहास सांगीतला.
आकाश पंडित याच्या स्वागतगीतने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ श्रीमती अचला देसाई यांनी स्वागत केले. प्रा प्रसन्ना जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. एस के इ संस्थेच्या सदस्या श्रीमती लता कित्तूर यानी संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली