तिसऱ्या रेल्वे गेट मधील उड्डाण पुलाच काम दिवाळी नंतर सुरू करण्यात येणार आहे निविदा काढण्यात आल्या आहेत अशी माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी दिली.
खासदार सुरेश अंगडी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी काडा कार्यालयात रेल्वे ओव्हरब्रिज उभारणी तसेच इतर रेल्वे सुविधांसंदर्भात बैठक झाली. रेल्वे, मनपा कॅन्टोन्मेंट, हेस्कॉम, पाणीपुरवठा मंडळ, महसूल आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांचा बैठकीत समावेश होता.
यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. यानंतर जुन्या पी बी रोड च्या उड्डाण पुलाची पाहणी करण्यात आली. धारवाड रोड उड्डाण पुलाच काम उशीर होण्यास पालिका जबाबदार असून गटार न खोदल्याने हे विलंब होत असल्याचा आरोप खासदार अंगडी यांनी करून लवकर लवकर पालिकेने सहकार्य करावे अश्या सूचना दिल्या.
गोगटे सर्कल ब्रिज हटवणार
खानापूर रोड गोगटे सर्कल वरील जुना पूल पाडवल्याशिवाय नवीन पूल उभा करता येणार नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी देताच अगोदर शहरातील ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यात आला. पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेट वर एकच उड्डाण पूल बनवण्याचा तोडगा काढण्यात आला मात्र याठिकाणी दोन स्वतंत्र वेगवेगळे उड्डाण पुल करण्याची गरज रेल्वे अभियंत्यांनी व्यक्त केली. यावेळी रेल्वे अभियंते प्रेम नारायण,पालिका आयुक्त शाशीधर कुरेर,कॅटोंमेंट सी ई ओ दिव्या शिवराम,बुडा आयुक्त शकील अहमद,आदी उपस्थित होते