जगभरातले पुरस्कार प्राप्त आर्टीस्ट आणि मनोरंजनाचा धमाका म्हणून ओळखली जाणारी रेम्बो सर्कस आजपासून बेळगावात आली आहे. आगामी गणपतीच्या तोंडावर ही सर्कस आकर्षण ठरत आहे.
खानापूर रोडवरील अग्निशामक दलाच्या समोरील जागेत ही सर्कस आली आहे. दररोज तीन खेळ असतील. दुपारी १, ४ आणि सायंकाळी ७ वाजता हे खेळ चालणार आहेत. १५० आणि २०० रुपये असा दर आहे. Book my show वर ती बुक करता येतात.
भारतीय कलाकारांचे पारंपरिक खेळ आहेतच उझबेकीस्थान, नेपाळ, इथिओपिया, कोलंबिया या देशातील कलाकार आणि त्यांचे खेळ पाहण्याजोगे आहेत.
सम्पूर्ण वातानुकूलित, वॉटरप्रूफ तंबू हे आकर्षण आहे. सम्पूर्ण कुटुंबाने पहावी अशी ही सर्कस तुमची वाट पाहते आहे.