Friday, December 27, 2024

/

पोलिसांनी केली डॉल्बी डिसेबलची तपासणी

 belgaum

POliceगणेश महा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि साऊंड सिस्टीम असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बेळगाव पोलिसांनी गणेश उत्सवात मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या डॉल्बी च्या दणदणाट आवाजाचा डेसीबल प्रमाणाची डेमो पाहून तपासणी केली.

पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट,उपायुक्त सीमा लाटकर,अमरनाथ रेड्डी,प्रदूषण नियंत्रण बोर्ड, सह ए सी पी अन्य पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते .पोलीस हेड क्वाटर्स मैदानात डॉल्बी लावून हा आवाजाचा नमुना तपासण्यात आला.

यावेळी साऊंड सिस्टीम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी टॉप 2 आणि 2 बेस साऊंड सिस्टम साठी 85 ते 100 डिसेबलचा आवाज वाजवून दाखविला .गणेश महा मंडळाचे गणेश दड्डीकर आणि विकास कलघटगी यांनी 2 बेस 2 टॉप साठी 85 ते 95 बेस साऊंड ची परवानगी ध्या अशी मागणी पोलीस आयुक्ता कडे केली आहे.मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवाला नंतर किती डिसेबल आवाज ठेवावा ते साऊंड सिस्टम असोसिएशन ला कळविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.