गणेश उत्सवात या वर्षी पी ओ पी ची मूर्ती किंवा रंग वापरू नका अन्यथा कारवाई केली जाईल अश्या स्वरुपाच्या नोटीसा गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील अनेक गावांतून पोलिसांनी या नोटिशी दिल्याने मंडळ कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे.काकती पोलीस निरीक्षकांनी अनेक गावातील मंडळीना नोटीस दिल्या आहेत.सर्व प्रथम बेळगाव live कडे ही नोटीस उपलब्ध झाली आहे नोटीस मध्ये पी ओ पी आणि रसायन मिश्रित रंगाचा वापर टाळा असा उल्लेख आहे.काकती पोलीस स्थानकातील अनेक मंडळांना या नोटिशी देण्यात आल्या आहेत.