ऐन गणेश उत्सवात प्रत्येक घरी पूजेचे आयोजन केले जाते पूजा झाल्यावर पूजेची फुले हार आणि वापरलेला इतर कचरा रस्त्यावर कचरा कुंडात न टाकता त्याचं पावित्र्य राखलं जावं आणि योग्य ठिकाणी हे साहित्य विसर्जित केलं जावं यासाठी अनगोळ भागात फिरते निर्माल्य कुंड वाहन बनविण्यात आले आहे.
नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी अनगोळ भागासाठी स्व खर्चातुन हे वाहनात फिरते निर्माल्य कुंड बनवलं आहे.गणेश उत्सव संपेपर्यंत हे कुंड वाहन अनगोळ मध्ये फिरून फक्त पूजेच्या साहित्याचा कचरा गोळा करणार आहे. महा पालिकेच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता नगरसेवक गुंजटकर यांनी केवळ अनगोळ भागासाठी का होईना हे फिरत कुंड बनवून पूजेचे साहित्याचं पावित्र्य जपत स्वच्छ भारत योजनेत देखील हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.
केवळ हातात झाडू घेऊन दर रविवारी फोटोबाजी करणे एवढंच स्वच्छ भारत योजनेची अंमलबजावणी नसून पालिकेच्या कोणत्याही निधीची वाट न बघता स्व खर्चातून बनविलेले फिरते निर्माल्य कुंड देखील एक स्तुत्य उपक्रमच आहे.शहरातील इतर भागातील नगरसेवकांनी देखील याच अनुकरण करणं गरजेचं आहे.