ब्रिटिशांना सळो की पळो करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते ११७ व्या जयंतीचे. क्रांतिसिंहांनी बेळगावला दिलेल्या भेटीची स्मृती जागवणाऱ्या चव्हाट गल्ली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात हा कार्यक्रम झाला.
ज्येष्ठ व्यक्तिमत्व ऍड किसनराव यळळूकर, भाजप नेते अनिल बेनके, पंच जयवन्त भोसले, नगरसेवक पुंडलिक परीट,यल्लप्पा मोहिते, सागर हसबे, जोतिबा किल्लेकर, उत्तम नाकाडी, सूरज अनगोळकर उपस्थित होते.