राजकीय वरदहस्त लाभलेली बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील नाल्या वरील अनाधिकृत बांधकाम बंद करा अशी मागणी जेष्ठ नगरसेवक किरण सायनाक यांनी पालिका सभागृहात केली त्या नंतर बराच वेळ सभागृहात यावर सविस्तर चर्चा झाली.
बेळ्ळारी नाल्या वरील अतिक्रमणाचा विषय सुरुवातील नगरसेवक राजू बिर्जे यांनी उपस्थित करत एक तर नाल्याचे बांधकाम थांबवा अन्यथा अनगोळ वडगाव भागातील शेतकऱ्यांना नाल्याचे अतिक्रमणात इमारत बांधां केल्याने होणारे नुकसान भरपाई देण्यास पालिकेने सज्ज व्हाव अशी भूमिका घेतली यावेळी अभियंत्या लक्ष्मी निप्पानीकर यांनी नाला तहसीलदाराच्या चौकशीच्या अख्तीयारीत येतो या प्रकरणाची चौकशी सुरु असून प्रांत अधिकारी तहसीलदार यावर कारवाई करतील अशी माहिती सभागृहाला दिली.
जेष्ठ नगरसेवक किरण सायनाक यांनी जर का धोंगडी यांच बांधकाम नाल्याच्या बफर झोन मध्ये यात कि नाही हे स्पष्ट करा अशी मागणी केली .
हव तर बरखास्त करा बेकायदेशीर अतिक्रमण थांबवा – सायनाक गरजले
बेळगाव उत्तर मतदार संघात एकही नाला नाही असा अहवाल पालिका अधिकाऱ्यांनी देताच किरण सायनाक यांनी टी व्ही सेंटर भागात एक आमदाराच्या मालकीच्या कंपनीने नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केला आहे असा आरोप करत सी डी पी मध्ये नाला असताना बांधकामाची परवानगी कशी दिली जाते असा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्र्या पर्यंत या प्रकरणात तक्रारी गेल्या असताना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी देखील त्यांनी मागणी केली.
महा पालिका बरखास्त झाली तरी चालेल राजकीय वरदहस्त असलेली नाल्यावरची बांधकाम रोखा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नगरसेवक दीपक जमखंडी यांनी या प्रकरणात पालिकेचे अधिकारी सामील असल्याचा आरोप करत अधिकारीच नगरसेवका विरुद्ध एकमेकात आग लावत आहेत असा देखील आरोप केला यावेळी पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी नाल्या वर बेकायदेशीर बांधकाम करण चुकीच असून कोणीही कितीही प्रभावी राजकारणी असले तरी बेक्यादेशीर बांधकाम बंद करू अस स्पष्ट केल.