सध्याच्या धार्मिक विद्वेषाची मळभट दाटलेल्या काळात बेळगावसारख्या संवेदनशील शहरात हिंदु-मुस्लिम ऐक्याचे युवा उदाहरण पहायला मिळत आहे. शहरातील शिवाजीनगरात राहणारा एक अहिंदु युवक मनोभावे गणेश भक्ती करतानाचे आश्वासक चित्र बेळगाववासियांसमोर आले आहे.
लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी एकीचा नारा देत सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. जात, धर्म, भाषाभेद विसरून सगळे जण एकत्र येणे हाच त्यांचा उद्देश्य होता. याचीच प्रचिती बेळगावातील शिवाजी नगरच्या तिसऱ्या गल्लीतल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या युवक पदाधिकाऱ्या कडे बघून येते.
धार्मिक सीमा ओलांडणाऱ्या जरताज जकाती या 19 वर्षीय मुस्लिम युवकाकडे निस्सीम गणेश भक्तीआहे .शिवाजी नगरातल्या सार्वजनिक गणेश मंडळाचा तो खजिनदार आहे.आपल्या गल्लीतील मंडळात गेली चार वर्षां पासून तो सक्रिय कार्य करत असून सध्या मंडळाचा मुख्य आधार स्तंभ बनलाय. या अगोदर तो एक वर्ष सेक्रेटरी एक वर्ष लिलाव कमिटी अध्यक्ष अशी पद सांभाळत सध्या खजिनदार पदी कार्यरत आहे.मंडळाचा सर्व आर्थिक व्यवहार, खर्च,पावती बुक इतर सर्व त्याच्याकडेच असते स्टेज मागील डेकोरेशन पासून इतर पडदे रंग ठरविणे आदी कामात तो आघाडीवर असतो.
बेळगाव शहरातील शिवाजी नगर मधल्या मंडळाचा एक पदाधिकारी म्हणून त्याला खूप अभिमान वाटतो गणेशाची भक्ती लहान पणा पासून मिळाली असून त्याने परंपरा जोपासली आहे.याच गल्लीतील त्याचे आजोबा अल्लाउद्दीन जकाती आणि त्याचे मामा आसिफ जकाती यांच्या नंतर तो गल्लीतील गणेश मंडळात तिसरी पिढी म्हणून सक्रिय आहे.नवीन पाटील या मंडळाचे अध्यक्ष असून जरताज हा सर्वांना घेऊन मंडळाची काम करत असतो.
ऋषिकेश खननूरकर,कार्तिक पतंगे,नेल्सन नागनुर,गौतम पाटील यासीर यककुंडी आणि जरताज जकाती या गल्लीतील युवकांचा ग्रुप असून सगळे जण मंडळा साठी कार्यरत असतात.एकूणच धर्मांची आडोसा बाजूला करत सगळ्या बेळगाव कर जनतेला एक एकी एकात्मता आणि धार्मिक सलोखा घालून दिलेल्या या शिवाजी नगरच्या युवकास बेळगाव live चा सलाम…
Gokaka