बसवतत्वावर चालणाऱ्या मठाधिशावर टीका करून खासदार सुरेश अंगडी यांनी संपूर्ण मठांचा अपमान केला आहे. या वक्तव्याचा निषेध करत मठ मशिदीत परीवर्तीत करा म्हणणारे अंगडी कोण असा प्रश्न के पी सी सी माजी सदस्य शंकर मूनवळळी यांनी केला आहे.
कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकेकाळी लिंगायत वेगळया धर्माची मागणी मान्य करणारे लिंगायत नेते भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या सुचने नंतर का मागे सरकत आहेत. मीच लिंगायतांचा नेता आहे असं म्हणणारे येदूरप्पा का गप्प आहेत असा देखील प्रश्न त्यानी उपस्थित केला आहे.
भाजपने हिंदुत्वाच्या नावावर मतं मिळवली असतील मात्र मठाधिश आता समाजाला न्याय देण्यासाठी पुढं आले आहेत त्यांनी मोर्चे आयोजित केलेत. लिंगायत धर्माला घटनात्मक न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मठाधिशा कडून राज्य आणि केंद्र सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र सुरेश अंगडी यांनी मठाधिशा बद्दलचं आपलं वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी मूनवळळी यांनी केली आहे
प्रभाकर कोरे यांनी लिंगायत मेळाव्यास मैदान ध्यायला आम्हीच मध्यस्थी केली होती अंगडीच्या म्हणण्या वरून कोरे यांना वादात ओढण चुकीचं आहे कोरे हे लिंगायत शिक्षण संस्था चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत अंगडींने कोरे बद्दल अस बोलणं चुकीचं आहे असं देखील ते म्हणाले