भारतात किंवा बेळगावात जातीय धर्मा वरून तेढ निर्माण करणे ही काय नवीन गोष्ट नाही आहे मात्र एका मुस्लिम धर्मीयांन हिंदूंच्या गणेश उत्सवात आपला आगळा वेगळा सहभाग दर्शवला आहे.जाती धर्मा पलीकडे जाऊन वेगळा विचार केलाय.बेळगावातील माळी गल्लीतल्या नुरुद्दीन बागेवाडी यांनी गेली कित्येक वर्षे आपल्या गल्लीतल्या गणपतीस एक बॉक्स फटाकडे देण्याची परंपरा जपली आहे.रविवार पेठ मध्ये तेलाचे डबे बनविण्याचे काम करणारे 55 वर्षीय नुरुद्दीन बागेवाडी हे दर वर्षी आपल्या गल्लीतल्या गणपतीस एक बॉक्स फटाके देत असतात गेली 40 वर्षाहुन अधिक वर्षे ते ही परंपरा जपत आलेत.
माळी गल्लीत सर्व धर्मियांचा वास असतो गेली चार वर्षे ते माळी गल्लीतून आझाद नगर स्थायिक झालेत तरी देखील दर वर्षी त्यांचे फटाके बॉक्स मिळतच आहेत या शिवाय मंडळाचं हे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यामुळं आझाद नगर हुन माळी गल्लीत मंडळास भेट देऊच अस म्हटलंय अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे यांनी दिली आहे.
नुरुद्दीन यांच्या गणेश उत्सवातल्या या वेगळ्या सहभागामुळ माळी गल्लीतल्या गणेश उत्सवाला एक वेगळी किनार लाभली आहे.