वीरशैव श्रेष्ठ की लिंगायत हा वाद उफाळून आला, काँग्रेस पक्षाने त्याचे राजकारण करून आपले काही लिंगायत पुढे केले. भाजपची कोंडी करून मतांचे राजकारण शिजले आणि त्यातून बाहेर पडले लिंगायत स्वतंत्र धर्म निर्मितीचे आंदोलन.बिदर नंतर मंगळवारी बेळगावातही हे आंदोलन झाले, यात मराठा क्रांती मोर्चाची कॉपी करण्याचा प्रयत्न झाला पण माणसे जमवता आले नाही आणि स्वतंत्र धर्माच्या नावाखाली सामान्य जनतेला भरडत राजकीय पोळी भाजून घेण्याचा स्वार्थच दिसला, बाकी काही नाही.स्वतंत्र धर्म झाला की अल्पसंख्यांक दर्जा मिळेल आणि लोक पुढे जाऊ शकतील हे एकच समीकरण घेऊन हे आंदोलन होत आहे, यात बसवराज होराट्टी सारखे नेतेही सहभागी झालेत, मराठा क्रांती मोर्चात राजकीय व्यक्ती आणि नेतृत्वान्नी आपला सहभाग चूप ठेवला होता, इथे सारेकाही उघड आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन होत आहे, उगाच भारतीय संविधानाला विरोध असा आरोप नको म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्यात आले नाहीतर हे आंदोलन केवळ उच्छभ्रू लोकांसाठीच झाले. तसा आरोपही शंकर मुन्नोळी सारख्यांनी केला यामुळे मराठा विरुद्ध दलित तसेच आता लिंगायत विरुद्ध मागास असे नवे आंदोलनही उभारले जाण्याची शक्यता मोठी आहे.
जैन, शीख, बौद्ध तसेच लिंगायत स्वतंत्र अशी मागणी करणे कितपत योग्य हा प्रश्न अजून तिढ्यातच आहे. आपल्या देशाचे नेमके कसे होणार ही बाजू अवघड आहे. हिंदू किंवा हिंदुस्थानी या पलीकडे जाऊन आणखी वेगळेपण मागण्याची गरज का निर्माण व्हावी याचे उत्तर सापडत नाही. एकीकडे समान नागरी कायदा अंमलात येण्याची गरज असताना आरक्षण, स्वतंत्र धर्म अशी नवी नवी किल्मिषे आणून आपण एकसंघ भारताचे नेमके काय करू पाहत आहोत? जगासमोर भारताचा हाच चेहरा आम्ही दाखवणार आहोत का?
भगवान बसवेश्वर यांनी धर्म स्थापण्याचा काळ वेगळा होता. जातीपातीच्या जोखडात अडकलेल्या समाजाचे विचार परिवर्तित करण्याचे महान मात्र तितकेच जोखमीचे काम त्यांना करावे लागले, यामुळे कामाच्या स्वरूपाने क्षुद्र जातीचा मानला गेलेला वर्गही आजवर अभिमानाने जात कुठलीही असो मी लिंगायत आहे असे सांगू शकत होता. या स्वतंत्र धर्माच्या आंदोलनाने बसवेश्वरांचे गोडवे गायले पण अंतर्गत जातीय संघर्ष उफाळून आणला, यात बसवेश्वरांच्या विचारांनाच मूठमाती दिली जात आहे काय? हे पहावे लागेल.
आंदोलन झाले, त्यात सर्वसामान्य संभ्रमात आहे, त्याला फरफटत नेऊन सत्ताकारण सुरू आहे, राजकारणी सगळेच एक माळेचे मणी, त्यांच्या त्या माळेत अडकलेला सामान्य चेहरा कधीच स्वतंत्र होणार नाही, स्वतंत्र धर्म झाला तरी