खानापूर तालुका एकीकरण समिती अध्यक्षपदी दिगम्बर पाटील यांची निवड आपणास विश्वासात घेऊन केलेली नसून ती मान्य नाही यात मध्यवर्ती समितीने पुढाकार घेऊन समेट घडवून आणावा अस आवाहन खानापूर चे आमदार अरविंद पाटील यांनी केलं आहे.
गेल्या आठवड्यात माजी आमदार दिगम्बर पाटील यांनी स्वतःला खानापूर तालुका समिती अध्यक्ष पदी निवड झाली असे जाहीर केले होते त्या नंतर आमदार अरविंद पाटील यांनी आपल्या समर्थकासह कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.रविवारी शिव स्मारकात या बैठकीचे आयोजन केले होते. खानापूर समितीत दुही की एकी हा चेंडू आता मध्यवर्ती समितीच्या कोर्टात आला आहे त्यामुळं मध्यवर्ती अध्यक्ष कोणता निर्णय घेतात हे बघणे महत्वाचे आहे.
रविवारी अरविंद पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांची संख्या कमी होती पूर्व भागातील कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.अनेक कार्यकर्ते हिरवे टॉवेल घेऊन बैठकीत सामील झाले होते.चक्क चौघानी या बैठकीत कन्नड मध्ये भाषण केले त्यामुळे बैठक समितीची होती की शक्ती प्रदर्शन याची चर्चा खानापुरात होती.अरविंद पाटील यांनी मराठी सोबत कन्नड आणि उर्दू भाषिकांना खेचण्यात यश बऱ्यापैकी मिळवलंय हे देखील सिद्ध झालं आहे.