बेळगावातील गणेश उत्सवात खडक गल्लीतील गणेश मंडळाला एक वेगळंच महत्व आहे.खडक गल्ली मंडळ हे एकमेव असं मंडळ आहे की गेली 56 वर्षे एकच प्रकारची मुर्ती आणि एकच मूर्तिकार ते म्हणजे कै जे जे पाटील हे वैशिष्ठय आहे. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मंडळात कार्यकारिणी निवडली जात नाहीं सर्व कार्यकर्तेच अध्यक्ष असतात. गल्लीतील सर्व गणेश भक्त मिळून हा गणेशोत्सव थाटात साजरा करतात.
या गणरायाकडे कोणत्याही गणेशभक्त मनापासून आपली मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी मागणी करतो आणि ती पूर्ण भक्त करण्यासाठी मंडपात धावून येतोय आतापर्यंत साकडं घालून मागण पूर्ण झालेल्या अनेक भक्तांनी सोन, चांदी, रुपये, प्रसाद, हार, अनेक वस्तूच्या रुपात दिली आहे म्हणूनच या गणपतीस नवसाला पावणारा खडक गल्लीचा राजा अस देखील म्हटलं जातं.
बेळगावच्या विसर्जन मिरवणुकीच देखील खास आकर्षण खडक गल्लीच ..दरवर्षी सर्वात शेवटी विसर्जन केला जाणारा असा हा मानाचा गणपती आहे…