कर्नाटकातील ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ एनगी बाळाप्पा वय 104 यांचे शुक्रवारी सकाळी एनगी ता सौदत्ती येथे वृद्धापकाळाने निधन झाले.उद्या सकाळी 11 वाजता एनगी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना तीनवेळा मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. अनेक चित्रपटात आणि पौराणिक नाटकात त्यांची कामे गाजली आहेत.
जगदज्योति बसवेश्वर, कित्तूर चन्नम्मा, अक्कमहादेवी, हेमरेड्डी मल्लम्मा, राजा हरिश्चंद्र, रामायण अनेक नाटकात त्यांनी कामे केली आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी सावित्रम्मा व लक्ष्मीदेवी, मुले डॉ बसवराज, अभियंते सुभाष, ऍड मोहन, अरविंद, मुली रुद्रामा, शकुंतला, पुष्पा व भाग्यश्री असा परिवार आहे.
छोट्या पडद्यावरील दिवंगत अभियंते एनगी नटराज हे त्यांचेच चिरंजीव होते. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि नाट्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
Trending Now